पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठीचा अवमान; हिंदी भाषेतील बॅनरमुळे वाद

   

पालघर, २८ जून: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या एका अधिकृत कार्यक्रमात हिंदी भाषेतील बॅनर लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात, तेही शासकीय कार्यालयात मराठीऐवजी हिंदीचा वापर केल्याने नागरिक आणि मराठीप्रेमी संघटनांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

     घटनेनंतर, हा प्रकार केवळ भाषेचा अपमान नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असलेली मराठी शासकीय कामकाजात वापरणे बंधनकारक असूनही, त्या नियमांची पायमल्ली झाली आहे, अशी टीका होत आहे.

     जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

    Post Views:  127

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999