*मुंबई वडोदरा महामार्ग प्राधिकरणाला परवाना देणाऱ्या खनिज कर्म जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे दीप सुनील शेलार याचा दुर्दैवी मृत्यू*
बोईसर - पालघर तालुक्यातील बोरशेती गावातीलअतिशय दुःखद अशी , हृदय पिलवटून टाकणारी घटना . चालु वर्षी दहावीची परीक्षा देऊन दीप सुनील शेलार वय वर्ष १७ सुट्टीच्या दिवसात आपल्या गावात मित्रांसोबत खेळत असताना, हातपाय धुण्याच्या निमित्ताने गेलेल्या दीप शेलार याचा पाय घसरला आणि तो थेट मुरूम खोदलेल्या खदानीमध्ये पडल्यामुळे दीप चा पाण्यात बुडून अकस्मात मृत्यू झाला आहे.
मुंबई वडोदरा एक्सप्रेस साठी काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात मुरूम खरेदी केला जातो, मात्र या ठिकाणी मुरूम खोदल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी लागले. मात्र जागा मालकाने व संबंधित ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे धोकादायक फलक या ठिकाणी लावले नसून या ठिकाणी तारेचे कुंपण सुद्धा केले नसल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले. गेलेल्या दीप सुनील शेलार हा अतिशय शांत सुस्वभावी व गुणवंत असणारा दिप आज आपल्या कुटुंबिय, नातलग, मित्र, ग्रामस्थांना व समाजाला सोडून गेला आहे. समाजामधील अशी तरुण युवक अकस्मात दुःखद घटना घडल्याने पालघर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मुंबई वडोदरा महामार्ग तयार करताना पर्यावरणाचा समतोल न राखता, ठेकेदार मात्र मिळेल तिकडे मोठमोठे खड्डे करून माती, मुरूम उपसण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. तर हा सर्व परिसर मृत्यूस आमंत्रण देणारा, चित्रविचित्र असा धोकेदायक बनला जात आहे. त्यामुळे या महामार्गाला माती मुरूम देत असताना वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांकडून धोकादायक खोदलेल्या खानी ,आजू बाजू ला तारेचे कुंपण करणे बंधनकारक आहे, शासनाचा तसा नियमच आहे. मात्र काही ठेकेदार आपली जबाबदारी झटकून मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत.
याच मनमानी कारभार व बेजबाबदारी पणामुळे पहिला बळी गेल्यामुळे मुंबई बडोदा महामार्गाच्या प्राधिकरणा विरोधात असंतोष पसरलाअसून दीप च्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .