*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोईसर शहराकरिता मंजूर झालेल्या निधीचा ठेकेदार भानुशालीनी केले नुकसान, ठेकेदाराविरुद्ध जनतेमध्ये आक्रोश*

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोईसर शहराकरिता मंजूर झालेल्या निधीचा ठेकेदार भानुशाली केले नुकसान*

   

बोईसर -सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर कडून रस्त्याच्या कामाकरिता आलेल्या पैशाचे ठेकेदाराने केले नुकसान.
    सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर कडून बोईसरच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असताना, त्याचे नुकसान कसे करायचे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भीम नगर बोईसर येथील चिराग रस्त्या जवळ मंजूर झालेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता ठेकेदार भानुशाली ह्यांनी अक्षरशः नुकसान केल्याचे दिसत आहे.      
                                                                                                         ह्या रस्त्याबाबत तेथील नागरिकांच्या  मनात मजेशीर चर्चा सुरू आहे की ,असा रस्ता कधी आम्ही बघितला ही नाही , आणि बघणार नाही. त्यामूळे एवढा सुंदर रस्ता बनवणारा ठेकेदार भानुशाली ह्याला सरकारने प्रमाणपत्र देऊन , त्याचा सन्मान करावा? अशा हर्ष युक्त प्रश्न तेथील नागरिकास पडला आहे. सदर रस्त्याचे काम स्थानिक  ठेकेदारास दिले असते  तर निश्चितच रस्ता चांगला झाला असता. परंतु बाहेरच्या ठेकेदाराला काम दिल्याने त्या रस्त्याचा बोजवारा उडाल्याचा  दिसून येतो. ठेकेदारांनी रस्त्याचे काम कधी सुरू  केले आणि कधी संपले हे तेथील जनतेलाही  कळले नाही. असे तेथील जनतेने म्हणणे आहे.
   
     सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट प्रतीचे झालेले असून त्या कामामुळे त्या रस्त्याने जाणारी शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना धुळीचे प्रदूषण सहन करून आपले आरोग्य धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. आमच्या कष्टाचा जमा झालेला पैसा जर ठेकेदार अशा पद्धतीने वाया घालवत असेल तर त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून, त्याला काळया यादीत टाकावे , सदर कामाचे बील अदा न करता ते थांबून ठेवण्यात यावे  .असे तेथील नागरिकांचे म्हणणे असून  ठेकेदार भानुशाली ह्याच्यावर कोणती कायदेशीर कारवाई होईल. ह्या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  242

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999

Get In Touch

123 Street, New York, USA

+012 345 67890

info@example.com

Follow Us
Flickr Photos