बोईसर ग्रामपंचायत मध्ये कामगार दिन व महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा
बोईसर : 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. तसेच अनेक ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम साजरे केले जातात. व महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणूनही साजरा केला जातो .
अशा महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत बोईसर मध्ये महाराष्ट्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी ग्रामपंचायत उप सरपंच निलम संखे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
यावेळी बोईसर ग्रामपंचायत उपसरपंच निलम संखे, ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.