वन विभाग व महसूल विभागाच्या जमिनीवर सुरू असलेली अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने?
पालघर तहसीलदार कारवाई करणार का?
बोईसर -बोईसर काटकर पाडा महसुली क्षेत्रातील गणेश नगर जुना सर्वे नंबर १०७ नवीन सर्वे नंबर ३० ह्या ठिकाणी महसूल विभागाने केलेल्या ११ जानेवारी २०२३ च्या तोडक कारवाईनंतर त्या ठिकाणी पुन्हा मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू झालेली असुन त्या बांधकामावर वन विभाग व महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
वन विभाग व महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाईनंतर बिगर आदिवासी सुनील प्रजापति व इतर भूमाफियाने चक्क ह्या विभागाला एका प्रकारची केराची टोपलीच दाखवली आहे.
सुनील प्रजापति व इतर भू माफियांनी काटकर महसुली क्षेत्रातील गणेश नगर ह्या भागामध्ये असंख्य अनधिकृत बांधकामे करून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला आहे .त्याच विभागांमध्ये त्याची आताही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. परंतु वन विभाग आणि महसूल विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सदर इसम ही कामे युद्ध पातळीवर करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ह्या भू माफियांवर कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय अशी कामे होऊ शकत नाही. तरी अशा ह्या भू माफियावर व अनधिकृत बांधकामावर पालघर तहसीलदार कोणती भूमिका बजावतात ह्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.