पत्रकार दांदळे यांचेवर खोटं तामगाव पोलिसांकडून दाखल खोटे गुन्हेमागे घ्यावेत

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची अमरावती पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी

   

अकोला-  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संग्रामपूर येथील सभासद ,एम‌.सी.एन.न्यूज ,युवा मराठा,आणि विश्वप्रभात वृत्तपत्रांचे प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर दांदळे पाटील यांचेवर पोलीसांचे अवैध व्यवसायांना अनैतिक संरक्षण आणि भ्रष्ट कारभाराच्या बातम्या प्रकाशित केल्यामुळे खोटे गून्हे दाखल करून दडपगीरी करण्याचा प्रयत्न केला.ही बाब लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री स्वप्निल देशमुख यांनी संघटनेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर  यांनी अमरावती परिक्षेत्राच्या पोलीस निरिक्षकांना एका पत्राद्वारे ही बाब कळवून गुन्हे मागे घेण्यात यावे व पोलिसांवर  कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

        खोट्या तक्रारीच्या घटनाक्रमात दर्शविलेल्या वेळेत पत्रकार दांदळे हे घरी असल्याचे सी..सी टीव्ही फुटेजवरून सिध्द होत असल्याने पोलिसांची अप्रामाणिकता आणि दडपगीरीच्या अमानुष वाटचालीचे पितळ उघडे पडले आहे.याबाबत पत्रकार दांदळे यांनी न्यायालयातही दाद मागीतली असून लोकशाहीचे संवर्धन आणि समाजाला संरक्षण देणाऱ्या पत्रकारांवर कायद्याच्या रक्षकांनीच अन्याय करण्याच्या गंभीर बेकायदेशीर बाबीची दखल घेऊन चौकशी व्हावी.दोषी पोलिसांवर कार्यवाही होऊन पत्रकार दांदळे यांचेवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष--संजय एम.देशमुख यांनी या पत्रातून केली आहे.

    Post Views:  292

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999