बोईसर : पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायत सदस्य अजय सुरेश शिणवार ( वय २७वर्ष ) व विक्रांत राजेंद्र चुरी ( वय २९वर्ष ) खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवाना मिळविण्याकरीता तक्रारदार यांच्या ओळखीच्या २ इसमाला ग्रामपंचायत कार्यालय मान यांच्या कडून नाहरकत दाखल्यासाठी मोबदला म्हणून एका नाहरकत दाखल्याचे एकूण २५०००/- रूपये याप्रमाणे २ दाखल्याचे एकूण ५००००/- रूपये लाचेच्या रक्कमेची अजय शिणवार यांनी मांगणी केली होती व विक्रांत चुरी यांनी लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहित केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्यावरुन लाचेचा सापळा रचून एका नाहरकत दाखल्याचा मोबदला म्हणून २५०००/- रूपये दि.०८/०२/२०२३ रोजी १३.१४वा.अजय शिणवार यांना त्यांच्या अजय बियर शॉप, शॉप नं. २०४६, बोईसर चिल्हार रोड, वारांगडे, येथे २५०००/- रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असुन विक्रांत चुरी यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. ठाणे परिश्रेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिश्रेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ जगताप, पोलीस उपअधीक्षक, स्वपन बिश्वास, पोलीस निरीक्षक, पोहवा -अमित चव्हाण, विलास भोये, संजय सुतार, निशा मांजरेकर, दिपक सुमडा, योगेश धारणे, पोना - सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकाने केली आहे.
Post Views: 324
आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501
Phone: 9766554999