हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य कलश यात्रा ,जगन्नाथ मंदिर कमिटी, व बोईसर चे उपसरपंच निलम संखे यांच्या मार्गदर्शनाखाली
बोईसर - हिंदू नववर्ष निमित्त आज गुढीपाडव्या च्या शुभमुहूर्तावर जगन्नाथ मंदिर, मंगलमूर्ती नगर बोईसर येथून कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये जवळजवळ १५०० ते २००० पेक्षा जास्त महिलांनी आपल्या माथ्यावर कलश घेऊन रथ यात्रेमध्ये सामील झाल्या होत्या.
कलश यात्रेला जगन्नाथ मंदिर मंगलमूर्ती नगर येथून सुरुवात होऊन ती डीजे नगर मार्गे, कामतेश्वर मंदिर शिगाव रोड येथून ती धनानी नगर येथे संपन्न झाली.
ह्या कलश यात्रेचे आयोजक व संयोजक बोईसर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री . निलम संखे व जगन्नाथ मंदिर चे ट्रस्टी सनत कुमार शाहू व त्यांच्या कमिटीने केले.
बोईसर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. निलम संखे ह्यांनी रथयात्रेमध्ये सहभागी झालेल्या तमाम महिला भगिनींना व जनतेला हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ह्या या कार्यक्रमांमध्ये बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील, चंदन सिंग, तसेच अनेक पदाधिकारी, ह्यांनी ह्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.