मनसेच्या जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यानी डॉक्टरवर हल्ला करून बेशुद्ध होईपर्यंत केली मारहाण
सर्व स्तरावरून मनसैनिकानेअमानुषपणे केलेल्या हल्ल्याचा होतो निषेध
बोईसर: दि. २० जानेवारी रोजी बोईसर येथिल शिंदे रुग्णालयाच्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्यावर मनसे पालघर अध्यक्ष समिर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने जिल्ह्यातील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट उसळली आहे.
घटनास्थळी तातडीने बोईसर पोलिसांकडून पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर, पो उपनिरीक्षक शरद सुरळकर, पो उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी, पो उपनिरीक्षक विजय डावखरे, पो उपनिरीक्षक आशिष पाटील सहित बोईसर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
दरम्यान डॉक्टरावर करण्यात आलेला हल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी चिंचणी येथील वयोवृद्ध गरिब रुग्णाचे बिल कमी करण्यासाठी समिर मोरे यांनी मेडिकल असोसिएशनचे डॉ. रत्नाकर माने यांच्या मार्फत डॉ. शिंदे यांना निरोप देण्यात आला होता. परंतु डॉ. शिंदे यांनी या आधीच मूळ बिल कमी केले होते. परंतु समिर मोरेंना बिलाची रक्कम अजून कमी करून हवी होती. यातून वाद झाल्याने समिर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिवशी रात्री डॉ. शिंदे यांना मारहाण केली होती. याबाबत डॉ. शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
समिर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. शिंदे यांना मारहाण करण्याचा कट रचला गेला. रात्री डॉ. शिंदे यांच्या रुग्णालयात जाऊन तेथील अतिदक्षता विभागातील रुग्णांची तपासणी करत असताना पत्रकाराला प्रतिक्रिया का दिली व झालेल्या प्रकाराबद्दल कुणालाही बाईट द्यायची नाही असे सांगून डॉ. शिंदे यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली तसेच सोबत असलेल्या मनसैनिकाकडून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करून रूग्णालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली.
सदर घटनेची गांभीर्याता पाहता त्याचवेळी जिल्ह्यातील बहुतांश डॉक्टर घटनास्थळी उपस्थित होते .सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत शिरसाट यांच्याकडे केली आहे . असून घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी समीर मोरे सहित इतर ९ जणांवर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं- २९/२०२३ भा. द .वि. सं कलम १४३, १४६, ३२३, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम २०१० चे कलम ०४ प्रमाणे डॉक्टर स्वप्निल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून समीर मोरे सहित इतर ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.