*कामगाराला न्याय मिळावा म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख व हिंद भारतीय कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष निलम संखे ह्यांचे थेट कामगार उपायुक्त यांना विनंती वजा आंदोलनात्मक पत्र*
हरेन टेक्स्टाईल कारखान्याने केली कायदयाची पाय मळणी
बोईसर -तारापूर औद्योगिक क्षेत्रातील *हरेण टेक्सटाईल* प्लॉट नंबर- जे १९४/१६९ ह्या कारखान्याच्या मालक व व्यवस्थापनाने कायम स्वरूपी कामगार राकेश शहा, कोड - २१४५ पद-जूनियर ऑपरेटर ह्याला कोणतीही लेखी पूर्व सूचना न देता, कायद्याची पायमळणी करून, कायदा आपल्या हातात घेत कामगाराला कामावरून कमी केले असल्याने त्या स्वतःवर व त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रसंग त्याच्यावर आले असता त्यांनी थेट निलम संखे यांच्या जनसंपर्क कार्याला धावघेऊन घडलेली घटना व झालेला अन्याय लेखी स्वरूपात कंपनी संबंधित कागदपत्रासह सादर करून न्याय मिळवून देण्यास विनंती केली. त्या पिढीत कामगाराची हकीकत ऐकून निलम संखे ह्यांनी थेट शुक्रवार २४ फेब्र २०२३रोजी कामगार उपयुक्त पालघर ह्यांना कामगाराला न्याय मिळवून देण्याकरिता विनंती वजा आंदोलनात्मक पत्र दिले.
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उपजिल्हाप्रमुख तसेच हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष निलम संखे ह्यांनी शिवसेनेच्या कार्याप्रमाणे २०% राजकारण आणि ८०% समाजकारण करत अनेक कामगारांचे व जनतेच्या हिताच्या दृष्टीने खूप मुलाची कामगिरी केली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील झकारिया टेक्स्टाईल , रिधम टेक्सपोर्ट, प्रेसट्रो ग्रेट व इतर कारखान्यामध्ये मृत्यू व जखमी झालेल्या कामगारांना व त्याच्या परिवारास योग्य तो न्याय व त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. त्यावेळेस मृत्यू पावलेले व जखमी झालेल्या कामगाराच्या परिवारांनी त्यांना खूप सारे आशीर्वाद देऊन त्यांचे आभारही मानले होते.
*हरेन टेक्स्टाईल*ह्या कारखान्यामध्ये राकेश शहा सन २०१७ पासून कार्यरत होता. मध्येच त्याला ब्रेक देऊन, सन ०१ सप्टेंबर २०२० मधे पुन्हा नियुक्ती पत्र देउन कायम स्वरुपी कामावर ठेवण्यात आले. सप्टेंबर २०२२ मधे सप्टेंबर महिन्याचा पगार देउन त्याला कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले.
सदर प्रकरणावर कामगार उपायुक्त,कामगाराला न्याय मिळण्यास सहकार्य करतात ,की कामगाराच्या न्याय हक्कासाठी निलम संखे ह्यांना आपल्या संघटनेमार्फत जन-आंदोलन करावे लागेल का?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.