पालघर!मुंबई वडोदरा एक्सप्रेस भरावाकरिता मोंटो कार्लो ह्या कंपनी तर्फे दिवस रात्र गौण खनिज उत्खनन करून ते कामाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी टाकले जाते. ह्या गाड्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे अति वेगाने वाहन चालत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्रमाणापेक्षा व नियमबाह्य मुरूम माती ट्रक मध्ये भरून जात असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुरूम माती पडून त्या ठिकाणी वाहन घसरून पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. असे असताना मात्र महसूल विभाग व परिवहन अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत अपघात होण्याची वाट तर बघत नाही ना? अशी शंका नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे.
प्रत्येक आठवड्यास दर सोमवारी खनिज वाहतुकीचा अहवाल तलाठी तहसीलदार कार्यालयास बिनचूक पाठविण्याचा आहे. तसेच खाणकाम सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत करण्याचे आहे ठरवून दिलेल्या वेळापूर्वी अथवा वेळेनंतर खाणकाम केल्याचे आढळून आल्यास संबंधितीवर नियम 79 नुसार कारवाई केली जाईल. असे विवरणपत्र अ मध्ये समाविष्ट केले असता त्याच्यावर कुठलेच काटेकोर पालन होताना दिसत नाही.
विवरण पत्र अ मध्ये असेही स्पष्ट लिहिले आहे की कोणतेही खनिज सांडू नये किंवा धूळ उडू नये यासाठी ट्रक किंवा ट्रॅक्टर्स ताडपत्री किंवा योग्य अशा इतर साधनाने झाकून गौण खनिजाची वाहतूक करावी. परंतु नागझरी ते चिंचपाडा ह्या रस्त्यावरून दिवस रात्र मोंटो कार्लो कंपनीने घेतलेल्या मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे करिता ट्रक ,डंपर ही चालत आहेत. कोणतेही नियम पालन न करता ह्या गाड्या राजरोस चालून त्याच्याने होणारे ध्वनी प्रदूषण ,वायू प्रदूषण ह्याचा थेट परिणाम परिसरातील वृद्ध, शाळकरीमुले, रुग्ण तसेच सामान्य जनतेवर होताना दिसत आहे.
विषयांकित ठिकाणी उत्खननाबाबत कोणतीही हरकत उपस्थित झाल्यास चौकशी अंती सदर परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी सक्षम अधिकाऱ्यांना राखून ठेवला आहे. असे स्पष्ट असताना अनेक तक्रारी करून सुद्धा त्या ठिकाणी कारवाई ही शून्य झालेली दिसते. नियम हे फक्त कागदावरतीच वापरले जातात त्याचे साक्षात कुठे पालन होताना दिसत नाही. ही पालघर आदिवासी बहुल जिल्ह्याची शोकांतिका आहे.