महसूल अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणारे माफिया कोण...
पालघर ! पालघर जिल्ह्यातील बोईसर मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील मौजे गुंदले येथे अवैध्य रित्या गौण खनिजे तस्करी करणाऱ्या माफियांवर बडगा उचलणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर गौण खनिज तस्करांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची वारंवार तक्रार मिळालेल्या तलाठी हितेश राऊत व मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी गौण खनिज अवैध वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त केले होते ट्रक जप्त केल्याचा राग मनात धिरज सुधीर भंडारी वय ३५ वर्ष राहणार दहिसर पाचमार्ग यांनी या महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला चढवत तलाठी हितेश राऊत यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत जीवघेणा हल्ला केल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाला होता.
घडलेल्या घटनेनंतर या अवैध खदाण चालविणाऱ्या व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कारवाई करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण पसरलेले असून सरकारी वनविभागाच्या भूखंडावरील गौण खनिज उत्खनन करून करोडो रुपये रॉयल्टी बुडविणाऱ्या तसेच पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगड खदाण व गौण खनिज बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियांवर पोलीसांचा फौजफाटा सोबत घेऊन महसूल अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागते की काय ?
दरम्यान बोईसर पूर्व भागात गुंदले, नागझरी, लालांडे या परिसरात अनेक दगड खदाणी बेकायदेशीर सुरू असून या खदाणीत अनेक कामगारांना जीव गमाववा लागलेला असून या बेकायदेशीर दगड खाणीत मोठ्या प्रमाणावर उत्खनन करत असताना पर्यावरण नियमांचे देखील काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. तर महसूल विभागाकडून कारवाई केल्यानंतर कारवाईचा राग मनात धरून माफियांकडून या अधिकाऱ्यांवर हल्ला चढवत जीवेठार मारण्याची धमकी दिली जात असताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावं लागतं आहे.
सदर प्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात MH04CG4152- प्रशांत राऊत, MH43E4494 - भूषण बांदिवडेकर व MH04EL0465 - धिरज सुधीर भंडारी यांचे मालकी तीन ट्रक जप्त करण्यात आलेले असून भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १३२, १२१,११५,३५२,३१५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पालघर तहसीलदार यांची प्रतिक्रिया
महसूल अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे होत असलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाही. पोलीसांच्या मदतीने उचित कार्यवाही केली जाईल: सुनील शेंडगे - तहसीलदार पालघर
मंडळ अधिकारी यांची प्रतिक्रिया
घटनास्थळी बोईसर मंडळ अधिकारी व तलाठी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असून अनधिकृत गौण खनिज वाहतूकीवर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून दोषींना कठोर शिक्षा होईल असा इशारा मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी दिला आहे.