पत्रकार हक्क व समाजहितासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा निर्धार

   

मुंबई ! पत्रकार हक्कांचे संरक्षण व समाजहितासाठी प्रभावी दबावगट निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ राज्यभर व्यापक सभासद नोंदणी मोहीम राबविणार आहे. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना राजकीय प्रवाहात उतरवण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी केले.

     प्रभादेवी, मुंबई येथे पार पडलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण व मुंबई विभागाच्या पाचव्या विचारमंथन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय मार्गदर्शक पुष्पराज गावंडे, महाराष्ट्र संघटक अरविंदराव देशमुख, मुंबई प्रदेश संघटक व मंत्रालयीन समन्वयक रफिक मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पत्रकारांसाठी राजकीय प्रवाहात सक्रीय होण्याचे आवाहन           पत्रकारांनी आयुष्यभर केवळ नेत्यांना मोठे करण्याचे काम न करता स्वतःही समाजहितासाठी पुढे यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. शिवसेना उपप्रमुख व आरोग्य समन्वयक विकास भोसले यांनी संजय देशमुख यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना त्यांना एक सक्षम व योग्य मार्गदर्शक म्हणून गौरविले.

     कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांना वंदन करून शाहिद जवान, अत्याचारग्रस्त महिला, दिवंगत पत्रकार, शेतकरी, हिंसाचार बळी, आपत्ती व अपघातग्रस्तांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 लोक स्वातंत्र्य समाज रत्न गौरव पुरस्कार जाहीर कार्यक्रमात       आमदार सुनिल प्रभू यांना \\\\\\\"लोक स्वातंत्र्य समाज रत्न गौरव\\\\\\\" हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच, संघटनेसाठी प्रभावी कार्य करणाऱ्या अरविंदराव देशमुख, सुषमा ठाकूर, पंजाबराव देशमुख, जगदीश प्रसाद करोतिया, संतोष घरत, देवेंद्र मेश्राम यांचा सन्मान प्रोत्साहनपर स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.

     कार्यक्रमात नव्या आणि अद्ययावत ओळखपत्रांचे (आय-कार्ड) वितरणही करण्यात आले. ठाणे जिल्हा संघटक संजय सोळंके, अंधेरी संघटक राजीव विश्वकर्मा, उमेश चौधरी, अनिता देशमुख, छाया मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुषमा ठाकूर यांनी केले.

    Post Views:  94

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999