लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी पुरस्कार प्रस्तावांना सुरुवात

   

पालघर, दि. ७ एप्रिल: समाजाभिमुख पत्रकारिता व सामाजिक कल्याणासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय संघटनेकडून यंदाही राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हा पातळीवरील सेवा गौरव, जीवनगौरव, समाजरत्न गौरव, कला गौरव आदी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
संघटनेच्या स्थापनेपासून केवळ चार वर्षांतच महाराष्ट्रासह चार इतर राज्यांमध्येही प्रभावी कामगिरी करीत या संघटनेने विविध उपक्रम, मोफत आरोग्य सेवा, सामाजिक न्यायासाठी लढे, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूल्यसंवर्धन यांसारख्या अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमठवला आहे.

     या पुरस्कार समारंभाचे आयोजन महाराष्ट्रातील एखाद्या तिर्थक्षेत्री किंवा निसर्गरम्य स्थळी करण्याचा मानस असून, यामध्ये पत्रकारिता, साहित्य, माध्यम, सामाजिक कार्य, आरोग्य सेवा, कृषी, विज्ञान, आपत्कालीन सेवा, लोककला, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

     पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपले कार्य परिचयपत्र, छायाचित्रे, वृत्तपत्रातील प्रकाशित बातम्या, चार पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड झेरॉक्ससह खालील पत्त्यावर २० एप्रिल २०२५ पर्यंत आपले प्रस्ताव पाठवावेत: श्री प्रदीप हरिभाऊ खाडे (ज्येष्ठ पत्रकार), राष्ट्रीय उपाध्यक्ष, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, \\\"पितृ छाया\\\", खेडकर नगर, अकोला (विदर्भ) – ४४४००१. मो. ९८२२२३००२५
अधिक माहितीसाठी संपर्क: ९४२२९३९९७९ / ९८५०२६८२६७ / ९८८१३०४५४६

     पुरस्कारांची निवड एक विशेष समितीद्वारे करण्यात येणार असून तिचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. नाममात्र नोंदणी शुल्कासह पारदर्शक प्रक्रियेद्वारे हा गौरव समारंभ पार पडणार आहे.

     संस्थापक अध्यक्ष संजय एम. देशमुख व सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या सन्मानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

    Post Views:  39

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999