परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

   

पालघर, 9 एप्रिल: राज्य शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत पालघर जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या लोक दरबारात कु. सानिका घरत या विद्यार्थिनीस तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्याचे मंत्री सरनाईक यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी हे प्रमाणपत्र मिळणे हे त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि समाधानकारक कार्य असल्याचे सांगितले.

     या लोक दरबारात 400 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या असून अनेक समस्यांवर तत्काळ निर्णय घेण्यात आला. कु. सानिका घरत हिची 12 तारखेला परीक्षा असून, जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यास ती परीक्षा देऊ शकली नसती. मात्र, या दरबारात तीला तत्काळ प्रमाणपत्र मिळवून देण्यात यश आले, याचा मला खास अभिमान आहे, असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले.

     दरबारात आ. विलास तरे, आ. रविंद्र फाटक, माजी आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार मनिषाताई निमकर, अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, जिल्हा परिषद सीईओ मनोज रानडे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

     सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, नागरिकांच्या अडचणींचे समाधान वेळेत व प्रभावीपणे करावे. लोक दरबार हे नागरिक, प्रशासन आणि शासन यांच्यातील समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण ठरावे, असे ते म्हणाले.

 सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाची पाहणी
     यावेळी मंत्री सरनाईक यांनी डहाणूतील सुर्यानगर येथे सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. वसई-विरार महानगरपालिकेस नोव्हेंबर 2023 पासून 170 द.ल.लि. पाणी पुरवठा सुरु असून लवकरच मिरा-भाईंदर महापालिकेसही पुरवठा सुरु करण्यात येणार आहे.

 पालघरला लवकरच नवीन आरटीओ कार्यालय
     मंत्री सरनाईक यांनी पालघर येथे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, पालघर आगाराची पाहणी करून विभागातील 8 आगारांना प्रत्येकी 5 नवीन बसेस देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

    Post Views:  195

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999