सू.क्ष. हिंदू कुणबी नोंदीबाबत सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाची मागणी ! महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाकडे निवेदन सादर

   

पालघर ! सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभागाच्या शिष्टमंडळाने दिनांक २३ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व शिष्टमंडळ तसेच जिल्हाधिकारी पालघर यांच्यासमवेत झालेल्या कार्यशाळेत सू.क्ष. हिंदू कुणबी या शालेय नोंदीसंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले.

     या शिष्टमंडळात मंडळाचे अध्यक्ष अच्युत धर्मा सातवी, विश्वस्त  सुनील शेलार, चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष नितीन पावडे, महेश पाटील, खजिनदार भूषण सातवी, झी मीडिया पत्रकार हर्षद पाटील आणि इतर पदाधिकारी सहभागी होते.

     निवेदनात त्यांनी नमूद केले की, अनेक शालेय दाखल्यांमध्ये सू.क्ष. हिंदू कुणबी अशी चुकीची जातनोंद करण्यात आली असून, सू.क्ष. (सूर्यवंशी क्षत्रिय) ही कुणबी जातीचा भाग नसून हिंदू कुणबी हीच नोंद अधिकृत व योग्य आहे. अशा चुकीच्या नोंदीमुळे समाजातील अनेकांना जातीचे दाखले मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

     त्यामुळे सू.क्ष. हिंदू कुणबी ही चुकीची नोंद रद्द करून केवळ हिंदू कुणबी हीच जातनोंद शालेय दाखल्यांमध्ये राहावी, अशी मागणी मंडळाने केली. यावर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग अध्यक्ष आणि उपस्थित शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत, भविष्यात याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल आणि योग्य पुरावे सादर केल्यानंतर समाजासमोरील अडचण दूर केली जाईल, असे आश्वासन दिले.


    Post Views:  162

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999