धोकादायक डिव्हायडरप्रकरणी शिवसेना आक्रमक! सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन

   

बोईसर ! बोईसर येथील यशवंत सृष्टी साईबाबा मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या धोकादायक डिव्हायडर आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सतत होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आक्रमक पक्षाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर यांना लेखी निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

     या ठिकाणी मागील काही दिवसांत गंभीर अपघातांच्या घटना वाढल्या असून, काल-परवा घडलेल्या दुर्घटनेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. विशेषतः एमआयडीसी परिसरातून ये-जा करणाऱ्या ट्रेलर्स आणि जड वाहनांमुळे या ठिकाणी वाहतूक अत्यंत धोकादायक झाली आहे.

 शिवसेना पक्षाच्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या  मांडण्यात आल्या आहेत

 यशवंत सृष्टी साईबाबा मंदिरासमोरील धोकादायक डिव्हायडरची योग्य रचनेनुसार तातडीने दुरुस्ती/पुनर्बांधणी करावी.

 संपूर्ण रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून रस्ता समतल करावा.

 स्पष्ट आणि ठळक रस्ता चिन्हे, झेब्रा क्रॉसिंग आणि रेडियम रिफ्लेक्टर्स लावावेत.

 वेगमर्यादा नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर अथवा रंबल स्ट्रिप्स बसवाव्यात.

 रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी पुरेशी आणि कार्यक्षम प्रकाशव्यवस्था करावी.

     या निवेदनप्रसंगी शिवसेना  बोईसर शहरप्रमुख अतुल देसाई, विभागप्रमुख अजय दिवे, तसेच पक्षाचे इतर कार्यकर्ते  उपस्थित होते.

     अतुल देसाई यांनी यावेळी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने जर आठ दिवसांच्या आत योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील.

    Post Views:  241

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999