बोईसरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष ! पारंपारिक तालावर थिरकला शहरवासीयांचा उत्साह

   

बोईसर, ता. ९ : बोईसर आदिवासी संघर्ष समिती (BASS)च्या
उत्कृष्ट आणि बारकाईने केलेल्या नियोजनामुळे जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा बोईसरमध्ये दणदणीत जल्लोषात पार पडला. पारंपारिक तारपा, धुमशा, सांगड वाद्यांच्या गजरात, पारंपारिक पोशाखातील नर्तकांच्या थिरकत्या पावलांनी शहरवासीय मंत्रमुग्ध झाले. सकाळपासून सुरू झालेल्या मिरवणुकीने बोईसरच्या रस्त्यांवर आनंदाचा उत्सव उधळला.

    कार्यक्रमाच्या प्रमुख मंचावर मान्यवरांची भव्य उपस्थिती लाभली. यामध्ये बोईसर ग्रामपंचायत सरपंच दिलीप धोडी, उपसरपंच निलम संखे, शिवशक्ती संघटना अध्यक्ष संजय पाटील,  नरेश धोडी, महेंद्र भोणे, सुरेश जाधव, राजू जाधव, अॅड.  जितेंद्र पाटील, अतुल देसाई, संदीप संखे, चेतन धोडी, अनिल रावते,  कामिनी सुतार, दशरथ सुतार, पंकज हाडळ, काशिराम वळवी, देविका वळवी, कल्पना मोर, रज्जू धोडी,  दीपा मोर,  नीलम म्हात्रे,  अंजली बारगा, कल्पना लडे, रवि संखे आदी मान्यवरांचा समावेश होता.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून समिती अध्यक्ष मनोज मोर यांच्या नेतृत्वाखाली सुनील म्हात्रे, पंकज सुतार, मनीष लडे, राजाराम वळवी, भुसारा साहेब, अशोक काटकर ,दिलीप कोती,कपिल वरठा,आकाश पाटील,  तसेच समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रमांची पराकाष्ठा केली. मिरवणुकीच्या जल्लोषात त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश लाभले.

     या सोहळ्याने केवळ आदिवासी संस्कृतीचे रंगतदार दर्शन घडविले नाही, तर बोईसरच्या सांस्कृतिक नकाशावरही एक संस्मरणीय ठसा उमटविला.

    Post Views:  171

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999