स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना पालघरमध्ये अभिवादन
पालघर ! (प्रतिनिधी) –1942 च्या चलेजाव चळवळीत प्राणार्पण केलेल्या पालघर तालुक्यातील पाच हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज पालघर येथे हुतात्मा स्तंभावर अभिवादन कार्यक्रम पार पडला. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
या दिवशी शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. हुतात्मा चौकात जिल्ह्यातील हुतात्मे काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड) आणि रामचंद्र महादेव चूरी (मुरबे) यांच्या बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, माजी आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, तहसीलदार रमेश शेंडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, हुतात्म्यांचे नातेवाईक, नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.