दीपक प्लास्टो कारखान्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू!तपास सुरू
बोईसर (प्रतिनिधी) – तारापूर एमआयडीसी परिसरातील दीपक प्लास्टो (प्लॉट क्र. जे-१) कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय विमल दुबे यांचा काल (११ ऑगस्ट २०२५) दुर्दैवी मृत्यू झाला. दुबे हे सिंग सेक्युरिटी सर्विसमार्फत या कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते.
सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास दुबे हे बाथरूमला गेले. मात्र बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर फोनचा आवाज बाथरूममधून येत असल्याचे लक्षात आले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दुबे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
तातडीने त्यांना टीमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुपारी २.२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून, रिपोर्ट येईपर्यंत मृत्यूचे कारण निश्चित सांगता येणार नाही, असे टीमा हॉस्पिटलचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले.
सदर प्रकरणाची मला काहीही कल्पना नाही .आमचे मॅनेजर आहेत त्यांना सर्व माहित आहे. तसेच ही पूर्ण जबाबदारी सिंग सिक्युरिटी सर्व्हिस वाल्याची आहे.तसेच आम्ही आमच्या कामगारांना पीएफ आणि ई एस आय सी देतो त्यांनाही द्यायला सांगितलं होतं
दीपक साहू - कारखाना मालक
या घटनेमुळे कंपनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.