सर्पमित्राची जीवघेणी स्टंटबाजी, लहानग्याच्या हाती अजगराची शेपटी!

   

पालघर — सर्पमित्राची निष्काळजी आणि धोकादायक स्टंटबाजी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सर्पमित्र सागर पटेल याने तीन ते चार वर्षाच्या चिमुकल्याच्या हाती थेट अजगराची शेपटी दिली आणि त्याचा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

     ही धक्कादायक घटना समोर येताच, प्राणी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, पीपल फॉर ॲनिमल वेल्फेअर\\\' या संस्थेने या स्टंटबाज सर्पमित्रावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

      ही अतिशय गंभीर आणि निष्काळजी कृती आहे. लहानग्याच्या जीवाशी खेळणं आणि प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर गुन्हा आहे. संबंधित सर्पमित्रावर तात्काळ कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.

 वैशाली चव्हाण, पीपल फॉर ॲनिमल वेल्फेअर

     सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, सर्पमित्रांची जबाबदारी आणि प्राण्यांच्या कल्याणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    Post Views:  222

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999