पालघर : सासऱ्याच्या कुऱ्हाडीच्या वाराने जावयाची हत्या ! फसवणुकीच्या रागातून थरारक घटना

   

पालघर ! सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या रागातून सासऱ्यानेच जावयाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे.

     कवटे पाडा येथे राहणाऱ्या युवराज जगताप या मूळ सातारा जिल्ह्यातील व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. झोपेत असताना सासरे जाणू रामा कवटे यांनी धारदार कुऱ्हाडीने मानेवर आणि डोक्यावर सपासप वार करून त्याचा जीव घेतला.

     ही थरारक घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, वाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

    Post Views:  173

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999